कोल्हापुरात तरुणावर गोळीबार


कोल्हापूर
कोल्हापूरच्या जवाहरनगर परिसरात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.साद शौकत मुजावर (वय २३) असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.मागील काही दिवसांपासून कोल्हापुरात टोळी युद्धाचा भडका उडाला आहे.पोलिसांनी तातडीने या गावगुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मुजावर हा जेवण करून रात्रीच्या वेळी बाहेर फिरायला गेला होता.त्याचवेळी चारचाकीमधून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. यात दोन राऊंड हवेत उडाले, तर एक गोळी मुजावर याच्या मांडीत घुसली आहे. दरम्यान, गोळीबारानंतर आरोपींनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने मुजावरच्या डोक्यावर हल्ला केला. त्याने हा हल्ला चुकविण्याचा प्रयत्न केल्याने तो बचावला,हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिक येत असल्याचं पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेत मुजावर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!