1 ऑगस्टपासून काही नियम बदलणार


 

मुंबई
दर महिन्याच्या एक तारखेला काही ना काही गोष्टी बदलत असतात. एक ऑगस्ट 2024 पासून तसेच काही बदल होणार असून त्याचा भार थेट खिशावर पडणार आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती बदलणार आहेत.एचडीएफसी बॅंक क्रेडिट कार्डचे चार्जेसही बदलणार आहेत. महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती ठरतात. एक ऑगस्टला कमर्शियल आणि घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची किंमत ठरते. गेल्या महिन्यात सरकारने कमर्शियल सिलेंडरच्या किमती कमी केल्या. या महिन्यात घरगुती सिलेंडरबाबत काही बदल होतात का याकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष आहे.
भाडं भरण्यासाठी क्रेड, चेक, मोबिक्विक, फ्रीचार्जसारख्या सेवा वापरणाऱ्यांना ट्रॅन्झक्शन अमाउंटवर एक टक्का चार्ज लागणार आहे. हा चार्ज प्रतिट्रॅन्झक्शन 3000/- पर्यंत मर्यादित असेल. 15,000 पेक्षा कमी फ्युएल ट्रॅन्झक्शनवर कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही मात्र त्यावरील ट्रॅन्झक्शनवर एक टक्का चार्ज लागेल. हा चार्ज प्रतिट्रॅन्झक्शन 3000/- पर्यंत मर्यादित असेल.
युटिलिटी ट्रॅन्झक्शनसंबंधीचे नियमही बदलण्यात आले आहेत. 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ट्रॅन्झक्शनवर अतिरिक्त चार्ज लागणार नाही. मात्र, त्यापेक्षा जास्त रकमेच्या ट्रॅन्झक्शनवर एक टक्का चार्ज लागेल. हा चार्ज प्रतिट्रॅन्झक्शन 3000/- पर्यंत मर्यादित असेल. क्रेड, चेक, मोबिक्विकसारख्या थर्ड पार्टी ॲप्सवरील ट्रॅन्झक्शनवर एक टक्का चार्ज लागेल. तोही प्रतिट्रॅन्झक्शन 3000/- पर्यंत मर्यादित असेल. उशिरा पेमेंट केल्यास लागणारं अतिरिक्त शुल्क हे 100/- ते 1300/- पर्यंत असेल. ते पेमेंटच्या रकमेवर ठरेल. ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करताना ईझी ईएमआयचा पर्याय निवडला असता 299/- ईएमआय प्रोसेसिंग चार्ज भरावा लागेल.
गूगल मॅप्सकडूनही भारतातील नियमांमध्ये बदल केले आहेत. हे बदल एक ऑगस्ट 2024 पासून देशभर लागू होणार आहेत. भारतातील सेवा शुल्क गूगल मॅप्सने 70 टक्क्यांपर्यंत कमी केलं आहे. या पुढे मॅप्स आपलं शुल्क डॉलरऐवजी भारतीय रुपयांत घेईल. मात्र, सर्वसामान्य युझर्सना गूगल मॅप्स वापरण्यासाठी कोणतंही शुल्क नसल्यामुळे हा नियम त्यांना लागू होणार नाही.
ऑगस्ट महिना सुरु होत आहे. या महिन्यात वीकेंडमुळे बँका सहा दिवस बंद असतील. या व्यतिरिक्त विविध सणांमुळे बॅंकांना सात दिवस सुट्टी असेल. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन, 19 ऑगस्टला रक्षाबंधन आणि 26 ऑगस्टला श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त बँकांना सुट्टी असेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!