लग्नाला जाण्याच्या घाईत चिमुरडीचा मृत्यू


3 वर्षांच्या मुलीला आई-वडील कारमध्येच विसरले

Advertisement

जयपूर
आई-वडीलांच्या निष्काळजीपणामुळे एका तीन वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. कारमध्ये गुदमरुन या मुलीचा मृत्यू झाला. एका लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी घाईने जाताना आई-वडिल मुलीला कारमध्येच विसरुन गेले आणि हि दुर्घटना घडली राजस्थानमधल्या कोटा इथंही ही दुर्देवी घटना घडली.
राजस्थानमधल्या कोटामध्ये राहाणारे प्रदीप नागर पत्नी आणि आणि दोन मुलींसह जोरावरपूरामधल्या एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. नागर कुटुंब आपल्या कारने कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले. आई एका मुलीला घेऊन कारमधून उतरली. तर प्रदीप नागर पार्किंग परिसरात कार पार्क करण्यासाठी गेला. तोपर्यंत आई आणि मोठी मुलगी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी निघून गेल्या. या दरम्यान प्रदीपने पार्किंगमध्ये कार लावून ती लॉक केली आणि समारंभात सहभागी झाले.जवळपास दोन तास प्रदीप आणि त्याची पत्नी लग्न सोहळ्यात विविध लोकांशी गप्पा मारत होते, तसंच त्यांनी जेवणही केलं. दोन तासांनी पत्नीने लहान मुलगी कुठे आहे याबाबत पती प्रदीपकडे विचारणा केली. पण लहान मुलगी आपल्याबरोबर नसल्याचं त्याने सांगितलं. यानंतर दोघंही घाबरले आणि मुलीची शोधाशोध सुरु झाली. लग्न सोहळ्यात कोणाकडेच त्यांची लहान मुलगी दिसली नाही. शोधाशोध करत असताना सर्व जण पार्किंग परिसरात असलेल्या कारजवळ पोहोचले. यावेळी तीन वर्षांची गौरविका कारच्या मागच्या सीटवर बेशुद्ध अवस्थेत आढळली.कुटुंबियांनी मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण उपचाराआधीच मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. पण मुलीच्या आई-वडीलांनी मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम आणि पोलिसात तक्रार दाखल करण्यास नकार दिला.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!