फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन
पर्यावरणप्रेमी साहित्यिकाची एक्झिट
मुंबई
ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते.मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. वसईत त्यांनी गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. दिब्रिटो यांचं मराठी साहित्य आणि पर्यावरण चळवळीमध्ये मोलाचं योगदान राहिलं आहे.धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिब्रिटो अध्यक्ष होते.
मराठी वर्तमानपत्रांमध्ये वाचकांची पत्रं आणि ललित लेख याद्वारे त्यांनी लेखनाला सुरुवात केली होती.1972 साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. 1979 साली ते रोममधल्या रोस्सा इथल्या कॉलिजियो दि सान पावलो या सेमिनरीमध्ये पुढील शिक्षणासाठी गेले.रोममधल्या शिक्षणाच्या काळात त्यांच्यावर पोप जॉन पॉल यांचा मोठा प्रभाव पडला. पोप यांच्यासह मदत तेरेसा यांना भेटताही आलं.
दरम्यान, त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बीए तर धर्मशास्त्रात एमए केलं.फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावरणप्रेमी आणि त्यासाठी आवाज उठवणारे कार्यकर्ते अशीच राहिली आहे.पालघर जिल्ह्यातील परिसरात त्यांनी सातत्याने पर्यावरणाच्या बाजूने भूमिका घेतली
