ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही


मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सर आक्षेप खोडून काढले
नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले.मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदारांची आकडेवारी, मतदान केंद्राची माहिती आणि भारतासारख्या मोठ्या देशात सार्वत्रिक निवडणूक घेतान येणाऱ्या आव्हानांची माहिती दिली. तसेच यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका मांडली. ईव्हीएमबाबतही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केले ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असे सांगून त्यांनी सर्व आक्षेप खोडून काढले

Advertisement

ईव्हीएमबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “या देशातील विविध न्यायालयांनी ४० वेळा ईव्हीएम विरोधात केलेल्या याचिकांवर सुनावणी घेतली आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकतं, यंत्र चोरी होतं, निकाल बदलू शकतो वैगरे वैगरे मुद्दे उपस्थित केले गेले. पण न्यायालयाने हे सर्व मुद्दे खोडून काढले आहेत. या यंत्राला व्हायरस लागू शकत नाही, अवैध मतदान होऊ शकत नाही. आता तर न्यायालयांनी ईव्हीएम विरोधातील याचिकांना दंड लावण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली न्यायालयाने नुकताच १० हजार रुपयांचा दंड लावला. त्यानंतर उच्च न्यायालयाने ५० हजारांचा दंड ठोठावला.”
राजीव कुमार पुढे म्हणाले, का पुन्हा पुन्हा ईव्हीएमवरून रणकंदन माजवले जात आहे. आम्ही सांगतो ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. आजकाल ईव्हीएमचे अनेक तज्ज्ञ लोक निर्माण झाले आहेत. सोशल मीडियावर ते डब्बे घेऊन बसतात आणि व्हिडिओद्वारे काहीबाही सांगत असतात. या तज्ज्ञ मंडळींनी कुठून पदवी मिळवली, हा संशोधनाचा विषय आहे. ईव्हीएमच्या ४० न्यायालयीन प्रकरणांवर आम्ही पुस्तक बनविले आहे. त्यावर १०० हून अधिक प्रश्नांची उत्तरे आम्ही दिले आहेत.
राजीव कुमार पुढे म्हणाले की, ईव्हीएमवर प्रश्न येणार, हे मला माहीत होतंच. त्यामुळं मी त्यावर काही ओळी लिहिल्या आहेत. “अधुरी हसरतो का इल्जाम, हर बार हम पे लगाना ठीक नही, वफा खुद से नही होती, खता ईव्हीएम की कहते हो”, अशी एका ईव्हीएम मशीनची खंत त्यांनी बोलून दाखविली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!