यशोदा’च्या डी. फार्मसी विभागास एक्सलंट ग्रेड


बाह्य परीक्षण समितीकडून उत्कृष्ट दर्जा संपादनाची परंपरा कायम
सातारा
यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फॅकल्टी ऑफ डी. फार्मसी विभागास, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईमार्फत नेमण्यात आलेल्या एक्स्टर्नल इन्स्टिट्यूट मॉनिटरिंग कमिटी कडून उत्कृष्ट दर्जा (एक्सलंट ग्रेड) प्रदान करण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी हे परीक्षण करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई मार्फत डिप्लोमा अभ्यासक्रम शिकवणारे शैक्षणिक संस्थांचे समितीकडून परीक्षण करण्यात येते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणासाठी आवश्यक असणार्‍या शैक्षणिक संसाधनांची उपलब्धता आणि त्याची व्यापकता या प्रमुख निकषांवर हा परीक्षण कार्यक्रम राबविला जातो.
बाह्य परीक्षण समिती म्हणजेच एक्स्टर्नल मॉनिटरिंग कमिटी मार्फत हे परीक्षण केले जात असल्यामुळे शैक्षणिक संस्था त्याकडे आव्हान आणि संधी या दुहेरी नजरेतून पाहतात. शैक्षणिक साधनांची उपलब्धता, ग्रंथालयातील संदर्भग्रंथांची उपलब्धता, विद्यार्थ्यांकडून या संदर्भग्रंथांची केले जाणारे वाचन आणि त्याची वारंवारता, संगणक प्रयोगशाळा तसेच संगणक प्रणालीचा वापर, प्रयोगशाळा सुसज्ज रूप आणि त्यातील साधनांची उपलब्धता, दरवर्षी होणारे प्रवेश आणि महाविद्यालय असणारी प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांची पसंती, मुलामुलींसाठी उपलब्ध असणारे वसतिगृह तेथील स्वच्छता आणि सुरक्षितता, शैक्षणिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी, शिक्षकांकडून सादर केले जाणारे शोध निबंध, शिक्षकांमार्फत केले जाणारे तज्ञ चर्चासत्रातील योगदान, सामाजिक जाणीवेच्या भावनेतून राबवले जाणारे समाजाभिमुख उपक्रम, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामंजस्य करार या आणि अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो.
यशोदा शिक्षण संस्थेतील विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आणि व्यवस्थापनाचा उत्तम शिक्षणासाठीचा कटाक्ष यामुळे हे यश मिळवणे शक्य झाल्याचे मत फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विवेक कुमार रेदासनी यांनी व्यक्त केले. फार्मसी विभागाच्या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष प्रा.दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा.अजिंक्य सगरे, कुलसचिव, सहसंचालक, प्राचार्य, यांनी सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले.
विभाग प्रमुख प्रा.आशिष थोरात, प्रा.स्वप्नाली पाटील, प्रा. नाझिया बागवान, प्रा. आशिष भोंगळे, प्रा. अमृता सोनमळे, प्रा.पूजा कदम, प्रा.श्रोनवी पवार आणि शिक्षकांनी या बाह्य परीक्षणासाठी विशेष तयारी करून हे यश संपादन केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!