साताऱ्यात प्राचार्य डॉ.सुनील कुमार लवटे यांची व्याख्यानमाला
२२ ते २४ ऑक्टोबर २०२४ अखेर तीन दिवस व्याख्याने
सातारा:
येथील आम्ही पुस्तक प्रेमी समूह ,श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थो) नगर वाचनालय आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा यांचे वतीने येत्या २२ ते २४ ऑक्टोबर २०२४ अखेर साहित्य ,संशोधन, संपादन,प्रशासन आणि समाजकार्य इ.क्षेत्रात समर्पण वृत्तीने कार्यरत प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांची तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मंगळवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी “साने गुरुजींचे अप्रकाशित साहित्य”, बुधवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी “वि स खांडेकर यांचे नवसंपादित साहित्य”आणि गुरुवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी “समग्र वाङ्मयातून दिसणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी” या विषयावर प्राचार्य डॉ. लवटे यांचे उदबोधन ऐकण्याची मेजवानी मिळणार आहे. मंगळवार दि. २२ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांचे शुभहस्ते व शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांचे उपस्थितीत अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल डॉ.सुनीलकुमार लवटे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.सर्व व्याख्याने नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये दररोज संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहेत.
तरी या तीन दिवसीय व्याख्यानमालेला अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने डॉ. संदीप श्रोत्री, श्री अजित कुबेर आणि श्री शिरीष चिटणीस ,विनोद कुलकर्णी,वैदेही कुलकर्णी आणि श्रीराम नानल यांनी केले आहे .

