श्रावणात सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा
सर्व समाजातील दत्तभक्तांना सहभाग घेण्याचे आवाहन
सातारा
येथील अखिल ब्राह्मण महासंघातर्फे श्रावण महिन्यात सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक ५ ऑगस्ट ते रविवार दिनांक ११ ऑगस्ट या कालावधीत सकाळी साडे सात ते १२ या कालावधीत यशवंत दत्तमंदिर शनिवार पेठ सातारा येथे हा सोहळा होणार आहे सदर पारायण निशुल्क असून सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे सर्व समाजातील दत्तभक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दत्त भक्तांना श्री गुरु चरित्राची पोथी भेट दिली जाणार आहे दत्त भक्तानी या सोहळ्यात भाग घ्यावा असे आवाहन अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी,उपाध्यक्ष श्रीराम देव,सचिव भास्कर मेहंदळे आणि महेश कुलकर्णी यांची केले आहे अखिल ब्राह्मण महासंघाच्या सोमवार पेठेतील कार्यालयात संपर्क साधल्यास याबाबत अधिक माहिती दिली जाईल
