मैदानात उतरा अन् ठोकून काढा


देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश

Advertisement

पुणे
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह मित्रपक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पुण्यात आज भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा भाजपच्या अधिवेशनात उपस्थित होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता आदेश नाही, मैदानात उतरा अन् ठोकून काढा,असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत. विरोधक म्हणतात की सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. त्यावर आम्ही विरोधकांना 2013 च्या सिलिंडरच्या किमती दाखवल्या. सध्याच्या किमतीपेक्षा त्या अधिक आहेत. त्यामुळे या किमती दाखवल्यानंतर विरोधक शांत बसतात. सध्या मी आत्मचिंतन करत आहे. सर्वांना उत्तर देता येतं. पण प्रत्येकजण आदेशाची वाट पाहत असतो. त्यामुळे आदेश आला तर उत्तर देऊ. नाहीतर उत्तर देणार नाही असे म्हणतो. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या. या पराभवानंतर भाजपने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. सध्या भाजप आणि मित्रपक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आज पुण्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, आज तुम्हाला परवानगी देतो. ज्याला बँटिंग करायची आहे, त्यांनी करा. मैदानात उतरा. पण अट एकच आहे की, हीट विकेट व्हायचं नाही.काही लोक बोलायला उतरले की ते समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. त्यामुळे त्यांना चार दिवस आधीच उत्तरं द्यावी लागतात. त्यामुळे आता बाकीचे आदेश विचारू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा. तुम्हाला खोटं बोलायचं नाही. खरं बोलायला विचार करावा लागत नाही. विरोधकांना खोटं बोलायचं आहे. मात्र, तुम्हाला खरं बोलायचं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता मैदानात उतरले पाहिजे. असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
महाविकास आघाडीचा इतिहास हा योजना बंद करण्याचा आहे. भाजप सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात बंद केल्या. ज्यामध्ये जलयुक्त शिवार आणि मेट्रो सारख्या योजनांचा समावेश आहे. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!