शिवकालीन वाघनखे दर्शनासाठी खुली


शिवप्रेमींसाठी साताऱ्यात ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शन खुलं
सातारा
छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे आता महाराष्ट्रात याची देही याची डोळा पाहता येणार आहे. शिवरायांनी याच वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढला होता. ही ऐतिहासिक वाघनखं आता लंडनहून साताऱ्यात आणण्यात आली आहेत.

 

साताऱ्यात वस्तू संग्रहालयात ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे फक्त वाघनखंच नाहीत तर इतर शस्त्रास्त्रांचंदेखील प्रदर्शन शिवप्रेमींना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. या ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडदा बाजूला करुन वाघनखांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. यानंतर पहिल्यांदाच शिवकालीन वाघनखांची पहिली झलक महाराष्ट्राला बघायला मिळाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आल्यानंतर आता सर्वसामान्यांनाही या वाघनखांचं दर्शन घेता येणार आहे. ही वाघनखं पाहता येणार आहे. साताऱ्यात वाघनखनांचं प्रदर्शन आहे. त्यामुळे सातारकरांना सुद्धा उत्सुकता आहे. या वाघनखांची लांबी 8.6 सेमी इतकी आहे. या वाघनखांचं वजन केवळ 49 ग्रॅम इतकं आहे.
सातारा येथील जिल्हा परिषद सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्याला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘गडगर्जना’ हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यानंतर मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवर हे वस्तू संग्रहालयात पोहोचले. तिथे वाघनखांसमोरील पडदा बाजूला सारुन वाघनखांसह शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर सर्व मान्यवर वस्तुसंग्रहालयातून जिल्हा परिषद सभागृहात परतले. या दरम्यान साताऱ्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रॅलीदेखील काढण्यात आली. यानंतर जिल्हा परिषद सभागृहात स्वागत-सत्कार समारंभ पार पडला.

Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झाल्यानंतर आता सर्वसामान्य शिवप्रेमींना सुद्धा हि वाघनखे याची देही याची डोळा पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे फक्त वाघनखंच नाहीत तर इतर शस्त्रास्त्रांचंदेखील प्रदर्शन शिवप्रेमींना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ असं नाव ठेवण्यात आलं आहे.

सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हि शिवकालीन वाघनखे नागरिकांना पाहण्यासाठी खुली राहतील . यासाठीची तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून घेता येतील. एका वेळी दोनशे लोकांना हे प्रदर्शन पाहता येईल. दिवसभरातून यासाठी चार स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये पहिला प्लॉट विद्यार्थ्यांसाठी मोफत राहणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!