सुवर्णयुगातील गाण्यांचा गोडवा आजही कायम


वसंत व्याख्यानमालेत स्वप्निल पोरे यांनी गुंफले दुसरे पुष्प

सातारा
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगात निर्माण झालेल्या संगीताचा गोडवा आजही कायम आहे भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या विविध संगीत विषय कार्यक्रमांमध्ये आजही या सुवर्णयुगातील गाणीच प्राधान्याने वाजवली जातात असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट अभ्यासक स्वप्निल पोरे यांनी काढले
ज्ञानविकास मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेमधील दुसरे पुष्प गुंफताना ते हिंदी चित्रपट संगीताचे सुवर्णयुग या विषयावर बोलत होते
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखक आणि सिनेअभ्यासक पद्माकर पाठकजी उपस्थित होते
साधारणपणे 1950 ते 1965 हा कालावधी हिंदी चित्रपट सृष्टीचा सुवर्णयुग मानला जातो याविषयी बोलताना स्वप्निल पोरे म्हणाले या कालावधीमध्ये निर्माण झालेले संगीत आजही लोकांच्या ओठावर आहे भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांचा या सुवर्णयुगामध्ये मोठा वाटा होता याव्यतिरिक्त महंमद रफी मुकेश तलत मेहमूद मन्ना डे किशोर कुमार आणि हेमंत कुमार या पुरुष गायकांचे सुद्धा या काळातील संगीताचा दर्जा वाढवण्यात मोठे योगदान आहे
स्वप्नील पोरे म्हणाले, त्या काळात एखादा चित्रपट जरी निर्मित आणि दिग्दर्शनदृष्ट्या चांगला नसला तरी केवळ संगीताच्या कारणामुळे तो चित्रपट तरुण जायचा भारतीय चित्रपट सृष्टीच्या प्रारंभापासून संगीत हा चित्रपटांचा अविभाज्य भाग असल्यामुळे आधुनिक काळामध्ये सुद्धा संगीताचे महत्त्व कायम आहे पण चित्रपटांच्या सुवर्णयुगाच्या कालावधीमध्ये जे संगीत निर्माण झाले त्याला तोड नाही

Advertisement

 


त्या काळामध्ये गायक गीतकार संगीतकार सर्वजण प्रचंड परिश्रम करत प्रत्येकालाच पूर्णतेचा ध्यास होता साहजिकच त्यांनी जे काम करून ठेवले आहे ते आजही आदर्शवत असेच आहे लता मंगेशकर यांच्यासारख्या एका महाराष्ट्रीयन मुलीने या कालावधीमध्ये मोठा वाटा उचलला होता याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटायला हवा,असेही पोरे म्हणाले
यावेळी बोलताना पद्माकर पाठकजी यांनीही थोडक्यात चित्रपटसृष्टीतील संगीताचा आढावा घेतला केवळ परिपूर्णतेच्या ध्यासामुळे आणि परिश्रम करण्याच्या वृत्तीमुळेच सुवर्णयुगाच्या कालावधीमध्ये कायम टिकेल असे संगीत निर्माण झाले असे त्यांनी सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजहंस यांनी केले आभारही त्यांनीच मानले
प्रारंभीज्ञानविकास मंडळाचे प्रसाद चाफेकर यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला
श्रोत्यांमध्ये शिरीष चिटणीस राजेंद्र माने  प्राध्यापक श्रीधर साळुंखे आणि मान्यवर उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!