हार्दिक नताशा यांचा घटस्फोट


दीर्घ चर्चेनंतर अखेर अधिकृत घोषणा
मुंबई:
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पत्नी नताशा स्टॅनकोविचला घटस्फोट दिल्याचं जाहीर केलं. २०२० मध्ये सर्बियन मॉडेल नताशा आणि हार्दिकचं लग्न पार पडलं होतं. त्यांनी दोनवेळा लग्न केलं. हार्दिक आणि नताशाचे लग्न कोव्हिड दरम्यान झाले होते, त्यामुळे ते थाटामाटात लग्न करू शकले नव्हते. म्हणून त्यांनी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर काही दिवस सर्व सुरळीत होते. पण त्यानंतर हळूहळू त्यांच्यांत दुरावा आला आणि त्यांची नात्यावरील पकड सैल झाली. त्यानंतर हार्दिकने अखेर त्याचा आणि नताशाचा घटस्फोट झाल्याचं सांगितलं.

Advertisement

हार्दिक पांड्या आणि नताशा यांची भेट २०१९ मध्ये एका पार्टीत झाली होती. एकीकडे हार्दिकचा करिअर ग्राफ यशाची नवनवीन शिखरं गाठत होता, तर दुसरीकडे त्याच्या आणि नताशाच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होत होतं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि २०२० मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर नताशाने मुलाला जन्म दिला आणि तिच्या करिअरला ब्रेक लागला. नताशा जे स्वप्न घेऊन भारतात आली होती ते लग्नानंतर पूर्ण होऊ शकली नाही, हेही त्यांच्या घटस्फोटाचे एक कारण असू शकते.
हार्दिक पांड्या हा बेफिकीरीने जगतो आणि नेहमी मस्तीच्या मूडमध्ये असतो. मैदानात असो किंवा मैदानाच्या बाहेर, त्याचा एक वेगळाच स्वॅग असतो. जेव्हा तो क्रिकेट खेळत नसतो तेव्हा तो पार्ट्या करतो आणि फिरायला जातो. लग्नानंतरही हार्दिकला आपली ही लाईफस्टाइल बदलणे शक्य झालं नाही. त्यामुळे कदाचित नताशाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असावी.
टी-२० विश्वचषकापूर्वी हार्दिक पांड्या त्याच्या करिअरच्या अत्यंत वाईट फेजमधून जात होता. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. यानंतर तो आयपीएलमध्ये परतला आणि थेट मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला. तो कर्णधार झाल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. या सगळ्यात त्याचा खेळही खूप प्रभावित झालेला दिसला. त्याचा ग्राफ खाली जात होता. त्यामुळे हार्दिकची कारकीर्द संपुष्टात आल्याचं बोललं जात होतं, पण त्याने टी-२० विश्वचषकात दमदार पुनरागमन करून आपल्या करिअरला वाचवलं. पण, तोपर्यंत कदाचित खूपच उशीर झाला असेल. हार्दिकच्या कमी होत चाललेल्या स्टारडममुळे आणि नताशासोबतच्या मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला असावा.
हार्दिक नताशा यांच्यातील मतभेद ते दाखवत नसले तरी स्पष्टपणे दिसून येत होते. २०२३ मध्ये दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर काहीच महिन्यांनी ते सोशल मीडियावर एकमेकांकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आलं.सार्वजनिक कार्यक्रमातही एकत्र दिसत नव्हते. त्यानंतर अखेर ते आता वेगळे झाले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!