सुंदर हस्ताक्षर हा लेखनाचा अविभाज्य घटक


हस्ताक्षर तज्ञ डाॅ. भाई बांदकर यांची कार्यशाळा
कणकवली
सुंदर हस्ताक्षर हा एक दागिना आहे तसेच सुंदर हस्ताक्षर हा लेखनाचा अविभाज्य घटक आहे.सर्व तोंडपाठ असेल पण मग कोणत्याही लेखी परीक्षेत मुलांना जेवढे पाठ आहे तेवढे तरी पैकीच्या पैकी मार्क्स का मिळत नाहीत? त्याचे उत्तर आहे अवाचनीय हस्ताक्षर. हस्ताक्षर कोणत्याही वयात सुंदर करता येते.हाच मुद्दा घेवून ओरोस येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये हस्ताक्षर तज्ञ डाॅ. भाई बांदकर यांची कार्यशाळा झाली.त्यांनी यावेळी सुंदर हस्ताक्षराचे महत्व विषद केले
डाॅ.भाई बांदकर यांचा हा 6794 वा कार्यक्रम होता.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ओरोस सरकारी हाॅस्पीटलचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुशीलकुमार परब हे होते.
डाॅ. सुशीलकुमार परब यांनी संपुर्ण कार्यक्रम अनुभवल्यानंतर आपले मत व्यक्त केले की अशा कार्यशाळा फक्त पालकांसाठी व इतर नागरिकांसाठीही ठिकठिकाणी व्हावेत.
या कार्यक्रमाचेपाहुणे भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री रणजित देसाई यांनीही या कार्यशाळेचे कौतुक केले.या कार्यक्रमाच्या आयोजिका सौ. प्रीती देवधर यांनी आयोजनाबरोबरच आर्थिक साक्षरतेविषयी थोडक्यात माहिती सांगितली.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक रायबान, शालेय समिती सदस्य श्री. संजय लाड, डॉ. परब, शिक्षक अशोक गीते, संजीव राणे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!