8,889 कोटींची रोकड जप्त


निवडणूक आयोगाकडून आतापर्यन्त कारवाई

नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाने आतापर्यंत सुमारे 8 हजार 889 कोटींचे घबाड जप्त केले. विशेष म्हणजे, आजवर जप्त करण्यात आलेल्या रकमेत अमली पदार्थांच्या जप्तीचा वाटा सुमारे 3958 कोटी रुपये इतका आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने शनिवारी दिली.निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सातत्याने पाठपुरावा, जिह्यांचा सातत्यपूर्ण आढावा आणि यंत्रणांच्या दक्षतेमुळे 1 मार्चपासून आतापर्यंत एवढी मोठी रक्कम जप्त केली. जेणेकरून लोकसभा निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात. पैशाचा किंवा बळाचा वापर होणार नाही, याची आम्ही काळजी घेत असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!