युनिव्हर्सल नाॅलेज स्कूलमध्ये ‘वन महोत्सव
सातारा
युनिव्हर्सल नाॅलेज स्कूल, वर्ये,सातारा येथे शाळेचे चेअरमन श्री.नितीन माने यांच्या मार्गदर्शाखाली ‘वन महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले.यावेळी प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील नियोजित जागेत विविध बिया तसेच रोपांची लागवड केली.विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची संकल्पना रुजवण्यासाठी तसेच प्रकृतीचे संतुलन राखण्यासाठी अशा उपक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे.याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.शाळेच्या उपप्राचार्या सौ.रोशनी चंदनखेडे,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी यावेळी वैयक्तिक सहभाग घेऊन विद्यार्थ्यांसोबत श्रमदानाचे कर्तव्य बजावलेआणि सर्व विद्यार्थ्यांचे या उपक्रमासाठी कौतुक केले.
