स्वातंत्र्य वीर सावरकर राज्य स्विमिंग स्पर्धा


सावली केअर सेंटरच्या वतीने भोगावती येथे आयोजन
कोल्हापूर
स्वातंत्र्य वीर सावरकर राज्य स्विमिंग स्पर्धा सावली केअर सेंटरच्या वतीने आज राधानगरी तालुक्यातील भोगावती येथील
राजर्षी शाहू जलतरण (कुरूकली )तलाव येथे घेण्यात येत आहे.स्पर्धेत राज्यातील एकूण 300 स्पर्धकांनी भाग घेतला आहे.
या राज्य ‌स्विमिंग स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे व कोल्हापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अनंत माने, प्रफुल्ल जोशी, सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे, भोगावती काॅलेजचे प्राचार्य,एम एम पाटील, प्राध्यापक सुनील खराडे,अॅड राजन देशपांडे गौरी देशपांडे,,‌क्रीडा महर्षी विजय जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी स्वरदा चंद्रशेखर फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या स्पर्धेचे आयोजन सावली केअर सेंटर चे कार्यकर्ते यांनी उत्कृष्ट रीतीने केले यावेळी लेखिका स्वरदा फडणीस हीचा सत्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेचे पंचांचे काम अजय पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
या स्पर्धेसाठी कोल्हापूर, पुणे नाशिक, नगर, संभाजी नगर, सातारा,इ. जिल्ह्यातील जलतरणपटू सहभागी झाले आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!