सोमवारी लेखक राजेंद्र घाडगे वाचकांच्या भेटीला


सोमवारी लेखक राजेंद्र घाडगे वाचकांच्या भेटीला
आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे आयोजन
सातारा
ऐतिहासिक, कथात्मक, संशोधनात्मक आणि वैचारिक विषयावरील पुस्तकांचे लेखक राजेंद्र घाडगे हे सोमवार दिनांक 30 जून रोजी वाचकांच्या भेटीला येणार आहेत. आम्ही पुस्तक प्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये सायंकाळी साडे पाच वाजता दीप लक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे राजेंद्र घाडगे आपल्या लेखन, जीवन आणि साहित्याचा प्रवास उलगडणार आहेत
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक प्राचार्य डॉक्टर विजयराव नलावडे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या समन्वयक स्वाती राऊत आहेत सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री, समन्वयक श्रीराम नानल , महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, आणि कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!