युनिव्हर्सल नाॅलेज स्कूलमध्ये वैद्यकीय तपासणी शिबिर


सातारा :
युनिव्हर्सल नाॅलेज स्कूल, वर्ये,सातारा येथे विद्यार्थ्यांसाठी ‘आरोग्य तपासणी शिबिराचे’ आयोजन करण्यात आले. शाळेचे चेअरमन श्री.नितीन माने यांच्या मार्गदर्शाखाली हा उपक्रम राबवण्यात आला
यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील रूग्णालय,सातारा(सिव्हिल हास्पिटल) येथे कार्यरत असलेले डाॅ.ऋतुराज देशमुख व डॉ.स्मिता भोसले,डॉ.रचना मोरे,सौ.वनिता पवार यांच्या सहकार्यातून हे शिबिर पार पडले.उत्तम आरोग्य कसे राखता येईल या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुण्यांचे ‘सीड बाॅल’ देत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.तसेच या कार्यक्रमादरम्यान
इयत्ता दहावीची विद्यार्थीनी आदिती यादव हिने सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाचा कार्यभार सांभाळला.यावेळी शाळेच्या उपप्राचार्या सौ.रोशनी चंदनखेडे,शिक्षक,विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!