जागतिक प्लॅस्टिक बॅग मुक्त दिन
युनिव्हर्सल नाॅलेज स्कूलमध्ये कार्यक्रम
सातारा
‘जागतिक प्लॅस्टिक बॅग मुक्त दिनानिमित्त’ युनिव्हर्सल नाॅलेज स्कूल, वर्ये,सातारा येथे अनोख्या पद्धतीनेसाजरा झाला शाळेचे चेअरमन श्री.नितीन माने यांच्या मार्गदर्शाखाली हा उपक्रम राबवत शाळेतील इयत्ता पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी कागदी पिशव्या बनवल्या. विद्यार्थ्यांना सामाजिक जनजागृतीचा संदेश देत प्लॅस्टिक वापराचे धोके,दुष्परिणाम इ.विषयी विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शाळेच्या उपप्राचार्या सौ.रोशनी चंदनखेडे,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
