सुखात्मे स्कूलमध्ये शाहूमहाराज जयंती
सातारा
सामजिक समतेचे व्रत स्विकारून उपेक्षित समाजघटकासाठी कल्याणकारी योजना राबवून त्याचे जीवनमान खऱ्या अर्थाने फुलविणारे राजर्षी शाहूमहाराज या घटकासाठी देवदूतच होते असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब ता जि सातारा येथील गौरीशंकरचे डॉ. पी. व्ही सुखात्मे इंग्लिश मीडियम(सी बी एस ई) स्कूल मध्ये राजर्षी शाहुमहाराज यांच्या जयंती निमित आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी स्कूलचे प्रभारी प्राचार्य, घनशाम चव्हाण व सर्व शिक्षक उपस्थित होते .
श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले,राजर्षी शाहुमहाराज हे दिनदुबळ्या समाज घटकाच्या व्यथा व वेदना जाणणारे एक संवेदनशील लोकराजा म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हदयात त्यानी स्थान मिळविले होते
प्रांरभी राजर्षी शाहुमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्मितल सावंत, हार्षदा तावरे, खिजर पटेल या विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहुमहाराज यांच्या कार्यकर्तूृत्वाचा आढावा घेतला.
प्रास्तविक व आभार विधी शिंगटे हिने केले
