अनुवादित ‘व्हाईट टाॅर्चर’ चे आज प्रकाशन
सातारा
नोबेल शांतता पुरस्कारप्राप्त लेखिका नर्गीस मोहम्मदी यांच्या ‘व्हाईट टाॅर्चर’ या पुस्तकाच्या राजश्री शहा यांनी केलेल्या मराठी अनुवादाचा प्रकाशन समारंभ दीपलक्ष्मी पतसंस्था, सातारा यांनी म.सा.प., पुणेचे कोषाध्यक्ष मा. विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते आयोजित केला आहे.या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, विचारवंत मा. किशोर बेडकिहाळ अध्यक्षस्थानी असणार आहेत. दै. प्रभात, साताऱ्याचे संपादक मा. श्रीकांत कात्रे प्रमुख पाहुणे असून लेखक, पर्यावरण अभ्यासक मा. डाॅ. संदीप श्रोत्री, म.सा.प., पुणे चे कार्यवाह मा. शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.मंगळवार दि. १८-०६-२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हाॅल, शनिवार पेठ, सातारा येथे संपन्न होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याला नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे.
