शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात आजपासून विविध कार्यक्रम
सातारा
येथील श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती आणि सातारा नगरपरिषद यांच्यावतीने तिथीनुसार ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ मंगळवार दि.१८ जून पासून होत आहे. सोहळ्यानिमित्त दि.१८,१९ आणि २० जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांच्यावतीने देण्यात आली.
शिवराज्याभिषेक सोहळ्यातंर्गत मंगळवार दि.१८ रोजी सकाळी ११ वाजता राजवाडा येथील प्रतापसिंह हायस्कूल येथे मान्यवरांच्या हस्ते वही वाटप करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती खा. श्री. उदयनराजे भोसले यांची असून माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, उद्योजक अमित महिपाल, माजी नगराध्यक्षा स्मिता घोडके, पत्रकार सुजित आंबेकर हे उपस्थित राहणार आहेत. बुधवार दि.१९ रोजी सायंकाळी ५ वाजता न्यू इंग्लिश स्कूल येथे प्रेरणादायी शिवव्याख्याते प्रा.डॉ. विनोद बाबर यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी रा.स्व. संघ शहर संचालक ॲड. नितीन शिंगटे, डे.ए.सोसायटी, पुणे नियामक मंडळ सदस्य, विश्वस्त अनंत जोशी, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण हे उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार दि.२० रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ७.३० वाजता शिवतीर्थ पोवई नाका येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख आणि मान्यवरांच्या हस्ते शिवमूर्तीस महाभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, सामाजिक कार्यकर्ते संग्राम बर्गे, दै.सकाळचे राजेश सोळस्कर, दै. लोकमत दीपक शिंदे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ५ वाजता भव्य पारं पारिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. खा. श्री.छ. उदयनराजे भोसले, आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. गांधी मैदान, राजवाडा येथून मिरवणुकीस प्रारंभ होईल. या सर्व कार्यक्रमांना सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे विशेष सहाय्य मिळाले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, सामाजिक कार्यकर्ते सागर भोसले, एबीपी माझाचे राहुल तपासे, झी २४ तासचे तुषार तपासे, एसबीएन चॅनेलचे प्रतिक भद्रे, उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना शिवप्रेमी, सातारकर, विविध मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे अध्यक्ष राजू गोरे, स्वागताध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष हरिष पाटणे, उपाध्यक्ष अमोल मोहिते, अभिजित बारटक्के, रवींद्र माने, रविंद्र भारती,नंदकुमार सावंत, अमर बेंद्रे, सागर पावशे, शुभम शिंदे, विक्रम पाटील, सयाजी चव्हाण, जयंत देशपांडे, अक्षय गवळी, अंजिक्य गुजर, उमेश जगताप, यांनी केले आहे.
