जरांगे यांना अंतरवालीतच विरोध
उपोषण करू नये म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन
जालना
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता अंतरवाली सराटीत उपोषण करु नये अशी मागणी अंतरवाली सराटीतल्या काही ग्रामस्थांनी केली आहे.या संदर्भात आज या ग्रामस्थांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना भेटून तसं निवदेन दिलं आहे. मागच्या दहा महिन्यांपासून जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करत आहेत. त्यामुळं या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून, आता लोकं वैतागले आहेत. त्यामुळं जरांगे पाटलांचं 4 तारखेचं उपोषण स्थगित करावं. परवानगी देवू नये अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.
विशेष म्हणजे जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध करणाऱ्या नागरिकांमध्ये जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता यावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंतरवाली सराटीमधीलच काही ग्रामस्थांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला आहे.
मागच्या दहा महिन्यांपासून जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करत आहेत. त्यामुळं या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून, आता लोकं वैतागले आहेत. त्यामुळं जरांगे पाटलांचं 4 तारखेचं उपोषण स्थगित करावं. परवानगी देवू नये अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.
