ठरलं तर मग मालिकेच्या नावावर विक्रम


तब्बल ५०० भाग टीआरपीमध्ये अव्वल

Advertisement

मुंबई
सध्या टेलिव्हिजन विश्वातील नंबर 1 मालिका स्टार प्रवाह’ वाहिनीची ‘ठरलं तर मग’ ही मालिका आहे नुकतंच या मालिकेनं 500 भागांचा टप्पा गाठला. पण टीआरपीमध्येहीही मालिका वरचढ ठरली आहे.तब्बल ५०० भाग टीआरपीमध्ये अव्वल राहण्याचा विक्रम मालिकेने केला आहे
‘ठरलं तर मग’ ही मालिका 05 डिसेंबर 2022 रोजी सुरुझाली होती या मालिकेतील अर्जुन आणि सायलीच्या जोडीनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं. या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. बघतबघता ‘ठरलं तर मग’ मालिकेनं सगळ्या मालिकांच्या टीआरपीचे रेकॉर्ड्स मोडत अव्वल स्थान गाठलं. गेली दीड वर्षे ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे. आता मालिकेनं 500 भागांचा टप्पा गाठताच टीआरपीमध्येही एक विक्रम केला आहे.
सायली आणि अर्जुनच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेनं टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच टीआरपीमध्ये सलग 500 एपिसोड नंबर वन ठरली मालिका ठरण्याचा रेकॉर्ड केला आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मालिकेत जुईने सोज्वळ आणि समंजस असलेल्या सायलीची भूमिका साकारली आहे तर अमित भानूशालीने डँशिंग, कर्तबगार आणि हुशार अर्जुन हे पात्र साकारलं आहे. या दोघांनीही आपल्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिलेला आहे. याशिवाय कल्पना, चैतन्य, अस्मिता, प्रिया, साक्षी, रविराज, प्रतिमा, नागराज, पूर्णा आजी या सगळ्या व्यक्तिरेखा महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाल्या आहेत. मालिकेचं कथानक आणि दमदार कलाकार यामुळे या ‘ठरलं तर मग’ टीआरपीमध्ये सतत आघाडीवर आहे.
मालिकेने एक नवीन टप्पा गाठला आहे तो म्हणजे या मालिकेचे तब्बल 500 भाग पूर्ण झाले आहे. यासंदर्भात मालिकेचे निर्माते सोहम व आदेश बांदेकर याशिवाय ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने पोस्ट शेअर करत सर्व कलाकारांचं कौतुक केलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!