रोहित शर्मा लेकीसोबत रमला
अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावरील फोटो झाले व्हायरल
वॉशिंग्टन
टीम इंडिया सध्या टी-20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करतेय. आतापर्यंत टीम इंडियाने 3 सामने खेळले असून या सर्व सामन्यांत विजय मिळवला आहे.भारतासाठी लीग स्टेजमधील शेवटचा सामना बाकी असून तो कॅनडासोबत असणार आहे. 15 जून रोजी हा सामना खेळवला जाणार असून यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा त्याची मुलगी समायरा सोबत वेळ घालवत आहे .
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये रोहित शर्मा त्याची मुलगी समायरासोबत दिसतोय. वडील आणि लेक दोघेही समुद्रकिनारी बसलेले दिसतात. एका फोटोमध्ये रोहित आपल्या मुलीला उचलून खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोमध्ये भारतीय कर्णधार आपल्या मुलीसोबत समुद्रकिनारी बसून वाळूशी खेळताना दिसतोय. चाहत्यांना हिटमॅनचे हे फोटो आवडले आहेत
