तीन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी


हनुमान जयंतीच्या प्रसादासाठी ग्रामस्थांनी केली तयारी

Advertisement

पुणे
आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील ग्रामदैवत हनुमानाचे जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षी थोरांदळे गावात मोठा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक उपस्थित असतात.
येथील पुरी गुळवणीच्या महाप्रसादाची आगळी वेगळी परंपरा शेकडो वर्षांची असून आजही टिकून आहे. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी गावातील सर्व महिला, पुरुष, जेष्ठ मंडळी एकत्र येऊन पुऱ्या गुळवणीचा महाप्रसाद तयार करतात . यासाठी यंदा ग्रामस्थांनी मानसी एक आठवा व उंबऱ्यामागे दोन आठवे ( शेरभर ) गहू गोळा करून तो एकत्र करून पुन्हा वाटला. सोमवारी (दि. 22)रोजी दुपारी पुऱ्या लाटण्याच्या कामाला महिलांनी सुरुवात केली . पुरुष मंडळींनी पुऱ्या तळण्याचे काम केले . तर गावातील जेष्ठ मंडळीनी चटणीसाठी कांदा चिरण्याचे काम केले .
यंदा महाप्रसादासाठी तब्बल तीन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी, व एक हजार किलो कांद्याची चटणी तयार करण्याचे नियोजन होते . या महाप्रसादासाठी गावातील ग्रामस्थ एकत्र येत असतात . तयार झालेला महाप्रसाद हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जन्माच्या कीर्तनानंतर उपस्थित ग्रामस्थ व पै – पाहुण्यांना खाऊ घातला जातो .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!