कारमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता


त्या कारबाबत पोर्शे कंपनीचा अहवाल, अडचणी वाढणार

Advertisement

पुणे : पोर्शे कार अपघातप्रकरणी अग्रवाल कुटुंबाच्या अडचणी आता अधिक वाढणार आहेत. अग्रवाल कुटुंबाच्या ज्या पोर्शे कारने अपघात झाला त्या कारबाबत पोर्शे कार कंपनीने अहवाल दिला आहे. या अहवालात कंपनीनं जे सांगितलं आहे, त्यामुळे आता अग्रवाल कंपनीच्या अडचणी अधिक वाढणार आहेत.अपघात झालेल्या गाडीमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता, असं कंपनीनं सांगितलं आहे. कंपनीनं अधिकृत अहवाल पोलिसांना सुपूर्द केला आहे. आहे. या अधिकृत तपासणीच्या अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली आहे.
अग्रवाल कुटुंबाने ज्या पोर्शे कारनं अपघात झाला त्या कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे पोर्शे कंपनीनं या कारची तपासणी केली. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या प्रतिनिधींनी येरवडा पोलीस ठाण्यात जाऊन गाडीची तपासणी केली होती. गाडीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीधील फुटेजसुद्धा तपासण्यात आले आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!