पाकिस्तान वर्ल्ड कपच्या बाहेर


अमेरिकेची सुपर-८ फेरीत दमदार एंट्री
फ्लोरिडा
टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या संघाला वर्ल्ड कपच्या बाहेर पडावे लागले आहे. दुसरीकडे मात्र यजमान अमेरिकेच्या संघाने यावेळी पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता अमेरिकेचा संघ हा टी-२० वर्ल्ड कपच्या सुपर – ८ फेरीत खेळताना दिसणार आहे.
शुक्रवारी पाकिस्तानचा सामना नव्हता, पण तरीही त्यांच्यावर वर्ल्ड कपच्या बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. पाकिस्तानचा अखेरचा सामना आयर्लंडबरोबर १६ जूनला होणार आहे. पण शुक्रवारी अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात सामना खेळवण्यात येणार होता. या सामन्याचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आणि त्यानुसार आता पाकिस्तानला वर्ल्ड कपबाहेर व्हावे लागले आहे.अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे अमेरिका आणि आयर्लंड या दोन्ही संघांना प्रत्येक एक गुण मिळाला आहे. त्यामुळे अमेरिकेचे या सामन्यापूर्वी चार गुण होते. हा सामना रद्द झाला आणि त्यांना एक गुण मिळाले. त्यामुळे आता अमेरिकेचे पाच गुण होतील. त्यांनतर पाकिस्तानने जरी अखेरचा सामना जिंकला तरी त्यांचे चारच गुण होतील. त्यामुळे अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि पाकिस्तानचा संघ अखेरचा सामना खेळण्यापूर्वीच वर्ल्ड कपच्या बाहेर गेला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अखेरच्या सामन्याला काहीच अर्थ राहणार नाही, कारण तो सामना जिंकून त्यांना सुपर – ८ फेरीत पोहोचताच येणार नाही.
पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात अमेरिकेने पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा भारताने पराभव केला होता. तिसऱ्या सामन्यात मात्र पाकिस्तानने कॅनडावर विजय मिळवला आणि त्यामुळे त्यांच्या खात्यात दोन गुण होते. पण आता जर पुढचा सामान पाकिस्तानने जिंकला तर त्यांचे चार गुण होतील. पण अमेरिकेचे पाच गुण असल्यामुळे पाकिस्तान वर्ल्ड कपच्या बाहेर पडला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!