पुण्यात पब-बारवर बुलडोझर


कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर कारवाई

पुणे
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर आता पुणे महानगरपालिकेने त्या जागेतील बेकायदा पब आणि रेस्टॉरंटवर कारवाई सुरू केली आहे. बुलडोझरच्या मदतीने परिसरातील बेकायदा पब आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात येत आहेया अपघाताला कारणीभूत असलेला पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अग्रवाल याच्या मुलाने इथल्याच बारमध्ये पार्टी केली होती. तो अल्पवयीन होता तरीदेखील या बारमध्ये त्याला प्रवेश दिला होता. अल्पवयीन असलेल्या मुलाला प्रवेश दिल्यामुळे आणि त्याला दारु सर्व्ह केल्याने या बारवरही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

नियम न पाळल्याने पालिकेने बार आणि पबवर कारवाईचा बडगा उगारल्याचं दिसत आहे. तर शहरातील इतर सर्व पब आणि बारला देखील पुणे महानगरपालिका नोटिसा पाठवणार आहे. वॉटर्स आणि ओरिला हे दोन पब पुण्यातील नामांकित पब आहेत. या पबमध्ये विकेंडमध्ये तरुणांची फार गर्दी असते. रात्री बराचवेळ हे पब्स सुरु असतात. मागील अनेक महिन्यांपासून हे अनधिकृत पब पुण्यात होते. यापूर्वी या पबवर कारवाई करण्यात आली नव्हती मात्र आता पालिका अॅक्टिव्ह मोडवर आली आहे आणि या पबवर थेट कारवाई करण्यात आली आहे.काल पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांना दारू पुरविल्याप्रकरणी पुणे शहरातील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) व पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल व परमिट रूम तसेच पबचे आस्थापना विषयक व्यवहार जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ प्रभावासह बंद केले आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक हॉटेल, पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये. पहाटे 1.30 नंतर कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये. नोकरनामधारक महिला वेटर्समार्फत रात्री 9.30 नंतर कोणतीही विदेशी दारू सर्व्ह करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
बॉम्बे प्रोहिबिशन कायदा 1949 आणि बॉम्बे फॉरेन लिकर नियम 1953 अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. संबंधित हॉटेल, पब आणि आस्थापनेला मद्य विक्रीबाबत देण्यात आलेले परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!