कॅफेमध्ये युवतीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार


सांगलीत शिवप्रतिष्ठानकडून कॅफेंची तोडफोड

Advertisement

सांगली
येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कॅफेत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अश्लील व्हिडिओ चित्रित केला गेला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलीवर शारीरिक बळजबरी करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.शहरातील कॅफेंमध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत असा आरोप करत संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीन कॅफेंची तोडफोड केली.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कॅफे हंग ऑन या ठिकाणी कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवण्यात आला. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे पदाधिकारी दिगंबर साळुंखे यांनी केला.
अशा घटना शहरातील कॅफेंमध्ये वारंवार घडत आहेत. त्यामुळे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी कॅफे हंग ऑन येथे हल्लाबोल करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.दोन वर्षांपासून शहरात हे प्रकार घडत आहेत. त्यासंबंधी प्रशासनाकडे लेखी तक्रार आणि पत्रव्यवहार देखली करण्यात आला. मात्र अनधिकृत कॅफे बंद झाले नाही, आणि अल्पवयीन मुला-मुलींचे शोषण थांबवण्याची मागणी शिवप्रतिष्ठान संघटनेकडून करण्यात आली.
शिवप्रतिष्ठानचे दिगंबर साळुंखे यांनी सांगितले, की अल्पवयीन मुलामुलींना फसवण्यासाठी कॅफे मालक मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. कॅफेमध्ये मुलामुलींसाठी अंधारी खोली उपलब्ध करुन दिली जाते. या अंधाऱ्या खोलीत प्रायव्हेट कॅबिन तयार करण्यात आले आहेत. तिथे अल्पयीन मुलामुलींचे लैंगिक शोषण केले जाते. त्याचे व्हिडिओ चित्रिकरण करुन ते समाजमाध्यमात व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलींवर बलात्कार केले जातात. कित्येक महिन्यांपासून आम्ही या गोष्टी प्रशासनाच्या नजरेस आणून देत आहोत. अनधिकृत कॅफेंची माहिती घेऊन त्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. त्यासाठी पाठपुरावा करत आहे. मात्र हे प्रकार सांगली शहरात थांबलेले नाहीत. गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी घटना असल्याचेही त्यांनी म्हटले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!