पत्नीच्या गुप्तांगाला लावले कुलूप


पत्नीवर अमानवीय अत्याचार करणाऱ्या आरोपी पतीला अटक

पुणे

पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर संशय घेणाऱ्या पतीने अमानवीय अत्याचार करत पत्नीच्या गुप्तांगाच्या बाजूला भोके पडून कुलूप बसवण्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस देखील या प्रकारामुळे चक्रावले असून या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Advertisement

हा पती या महिलेला सतत संशय घेत मारहाण करत असे या पतीने ब्लेडने महिलेच्या गुप्तांगावर वार केले नंतर तिचे हातपाय बांधून गुप्तांगाला लोखण्डी खिळ्याने दोन छिद्र पाडले आणि त्यावर पितळी कुलूप लावले.पीडित महिलेने पतीच्या या अशा अमानवीय कृत्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. हे दाम्पत्य नेपाळचे असून महिला गृहिणी आहे तर पती वॉचमनचे काम करतो. पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!