अभिनेत्री पवित्रा जयरामचेअपघातात निधन


बहिणीसोबत तीन जण गंभीर जखमी

Advertisement

बंगळुरू
झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पवित्रा जयरामचं अपघातात निधन झालं आहे. या अपघातात अभिनेत्रीच्या बहिणीसोबत अन्य तीन जण देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या घटनेमुळे सिनेविश्वात आणि चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.पवित्रा जयराम दाक्षिणात्य टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.तिची बहीण, ड्रायव्हर आणि अभिनेता गंभीर जखमी आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील हनाकेरे येथे परतत असताना हा भयानक अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.कारचे नियंत्रण सुटले आणि कार मेहबूब नगरमध्ये डिव्हायडरला धडकली. त्यानंतर हैदराबादहून वानापर्थीकडे येणारी बस कारच्या उजव्या बाजूला धडकली. या अपघातात पवित्र हिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत पवित्राचा चुलत बहीण अपेक्षा, चालक श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांत गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!