ब्राह्मणांनी शेती आणि उद्योगाकडे वळावे
पत्रकार सुशील कुलकर्णी यांचे आवाहन
सातारा
पुणे आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये सकाळी सात ते रात्री 10 वाजेपर्यंत नोकरीच्या चक्रात पिळून घेण्यापेक्षा ब्राह्मण समाजातील युवकांनी उद्योगाकडे आणि शेतीकडे वळावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार आणि ऍनलाईझर या यूट्यूब चॅनलचे प्रमुख सुशील कुलकर्णी यांनी केले
अखिल ब्राह्मण महासंघातर्फे येथील शाहू कला मंदिरामध्ये परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते
सुशील कुलकर्णी पुढे म्हणाले केवळ नोकरीच्या मागे लागल्यामुळे ब्राह्मण समाजातील मुलांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे कारण चांगले पॅकेज, गाडी आणि पुण्यात घर या दुष्ट चक्रामध्ये ही मुले अडकली आहेत या चक्रातून बाहेर पडून स्वतःचा व्यवसाय उभा करणे किंवा शेती करणे हा पर्याय आता ब्राह्मण समाजातील मुलांनी स्वीकारायला हवा
महाराष्ट्रातील अनेक ब्राह्मणांनी आपले उद्योग यशस्वी करून दाखवले आहेत तसेच राज्याच्या ग्रामीण भागामध्ये अनेक ब्राह्मण शेतकरी संपूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने यशस्वी शेती करत आहेत असा दाखला सुद्धा त्यांनी दिला

ब्राह्मण समाजावर घेण्यात येणाऱ्या सर्वसाधारण आक्षेपाविषयी बोलताना सुशील कुलकर्णी म्हणाले,ब्राह्मण ही जात नसून ती एक व्यवस्था आहे पण कुठल्यातरी जुन्या ग्रंथामधील एखादा अर्धवट श्लोक घेऊन विनाकारण ब्राह्मण समाजावर टीका केली जाते ब्राह्मण समाज संपूर्णपणे पुरोगामी असतानाही विनाकारण त्यांना मनुवादी म्हणून हिणवले जाते क्षत्रिय राजा मनूने लिहिलेल्या मनुस्मृतीबद्दल ब्राह्मणांना दोषी धरले जाते
आगामी कालावधीमध्ये ब्राह्मण समाजाला एकत्र येऊन आपली संघटित शक्ती दाखवावी लागणार आहे केवळ एकमुखाने नाही,तर अनेक मुखांनी बोलून प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया देण्याची गरज आहे कोणत्याही राजकीय वळचणीला जाऊन संघटन मजबूत करण्यापेक्षा प्रत्येकाने मनापासून एकत्र येऊन संघटित शक्ती दाखवायला हवी असेही आवाहन त्यांनी केले
कार्यक्रमातील दुसरे वक्ते लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी आपल्या भाषणामध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची माहिती दिली एकमुखाने आणि एकसंघपणे पुढे जाणारा समाज प्रगती करतो हे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले

वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी भगवान परशुराम यांच्याबाबत असलेल्या आक्षेपांचा उल्लेख करून ते आक्षेप खोडून काढले
यावेळी विवेक शास्त्री गोडबोले, गोविंद शास्त्री जोशी अनिरुद्ध गुमास्ते यांच्या सह ब्रह्मवृद्धांनी परशुराम स्तोत्र शांतीपाठ, रेणुका अष्टक याचे पठण केले ब्राह्मण समाजातील भगिनींनी शिवतांडव स्तोत्र सादर केले या स्तोत्रावर विशाखा सोहनी, मृण्मयी मेहंदळे आणि पृथा टोणपे यांनी भरतनाट्यम सादरीकरण केले

यावेळी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर यशस्वी चढाई करणारी सातारकर कन्या धैर्या विनोद कुलकर्णी हीच सत्कार राजेंद्र निंभोरकर आणि सुशील कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला
या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पांडे यांनी केले प्रास्ताविक ऊर्जा फाउंडेशनचे आशुतोष गोखले यांनी केले महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी संघटनेच्या कामाची माहिती आपल्या मनोगतात दिली महेश कुलकर्णी यांनी आभार मानले

चौकट
या कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्व ब्राह्मण समाज बांधवांसाठी अल्पोपहाराची सोय राज्याचे उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती हिंदवी पब्लिक स्कूल आणि श्रीनिधी ग्रुपचे अमित कुलकर्णी यांनी त्याचे सुरेख नियोजन केले होते
