पद्मभूषण जेष्ठराज भालचंद्र जोशी यांना सातारा भूषण


लवकरच भव्य कार्यक्रमामध्ये पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार
सातारा
रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट, सातारा व सातारकर नागरिकांतर्फे दरवर्षी ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या आणि सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला / संस्थेला “सातारा भूषण” पुरस्काराने गौरविले जाते.
यावर्षीचा हा पुरस्कार पद्मभूषण जेष्ठराज भालचंद्र जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे स्वर्गीय अरुणराव गोडबोले यांच्या मासिक श्राद्ध दिनी या पुरस्काराची घोषणा ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे विश्वस्त परिवाराने केली असून लवकरच एक भव्य कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या ट्रस्टचे विश्वस्त डॉ.अच्युत गोडबोले यांनी दिली.
स्वर्गीय अरुण गोडबोले यांनीच जोशी यांच्या नावाची निवड केल्यामुळे हा पुरस्कार आवर्जून ज्येष्ठराज जोशी यांना प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री . ज्येष्ठराज जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मसूर येथे झाला असून त्यांचे शालेय शिक्षण कराड येथे पूर्ण झालेले आहे डॉक्टर जेष्ठराज जोशी यांनी डॉक्टर होमी भाभा इन्स्टिट्यूट ,मुंबई तसेच परदेशातील अनेक विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम केले आहे. 54 वर्षे संशोधन व अध्यापनाचे काम करणारे श्री .जोशी यांना सन 2014 साली पद्मभूषण पुरस्काराने भारत सरकारने गौरविलेले असून त्यांना याबरोबरच भटनागर पुरस्कार, उत्तम शिक्षक पुरस्कार आदी मान्यवर पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे त्यांची 1000 हून अधिक संशोधनावरील विशेष पब्लिकेशन ही प्रकाशित करण्यात आली असून नवीन प्रकारच्या केमिकल व औद्योगिक इंजीनियरिंग मधील संशोधनासाठी त्यांनी केलेले संशोधन व अध्यापनाचे काम खरोखरच गौरवपूर्ण असे आहे जोशी यांनी मराठी विज्ञान परिषदेसाठी विशेष योगदान दिले असून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी ही त्यांनी केलेले कार्य हे गौरवपूर्ण असे आहे अनेक नामवंत अकॅडमीचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले असून 200हून अधिक विद्यार्थी त्यांच्या शोधनिबंधांवर अभ्यास करून त्यांनीही पीएचडी ही पदवी प्राप्त केलेली आहे .आणि अनेक नवनवीन शोध श्री. जोशी यांनी लावले असून विविध प्रकारची अतिशय सुरेख अशी डिझाईन्स श्री .जोशी यांनी आत्तापर्यंत तयार केलेली आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून सातारा जिल्ह्यातील मूळ असलेल्या श्री .जोशी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
रासायनिक, अभियांत्रिकी आणि अणुविज्ञान क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून सन २०२५ च्या “सातारा भूषण” पुरस्कारासाठी पद्मभूषण जेष्ठराज भालचंद्र जोशी यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक मान्यवरांना सदर पुरस्काराने सन्मानित केले आहे. सदर परंपरा गेली ३४ वर्षे अखंडपणे चालू आहे. सन १९९१ पासून ट्रस्टने “सातारा भूषण” पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू केला. त्यामार्फत दरवर्षी ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला “सातारा भूषण” पुरस्काराने गौरवले जाते. रोख रु. ४० हजार व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन्मानित व्यक्तीला त्या क्षेत्रातीलच व्यक्तीच्या हस्ते आणि इतर मान्यवर व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली उत्तम समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जातो. या सर्व कार्याला सातारकरानीही सदैव मोलाची साथ दिली आहे. जिल्ह्यातील तरुणानी प्रेरणा घेवून आपले कर्तुत्व घडवावे असाच यामागचा उद्देश आहे.तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,ह.भ.प. भगवानमामा कराडकर,स्वरराज छोटा गंधर्व,खा. शरद जोशी,डॉ. निळकंठराव कल्याणी,स.भ. मारुतीबुवा रामदासी,डॉ. राजेंद्र शेंडे,प्रा. शिवाजीराव भोसले,गुरुवर्य बबनराव उथळे,डॉ. रा. ना. दांडेकर,राजमाता श्री. छ. सुमित्राराजे भोसले,शाहीर साबळे,कै. डॉ. नरेंद्र दाभोलकर,ह.भ.प. बाबामहाराज सातारकर,गिरीश कुबेर,बी. जी. शिर्के,रयत शिक्षण संस्था,सविता प्रभुणे,ललिता बाबर,चित्तरंजन कोल्हटकर,अपर्णा रामतीर्थकर,यमुनाबाई वाईकर,प्रताप गंगावणे,प्रा. डॉ. यु. म. पठाण,डॉ. काटकर बंधू,सयाजी शिंदे,ह.भ.प. चारुदत्त आफळे,प्रा. डॉ. गो. पु. देशपांडे,डॉ. प्रमोद चौधरी,चेतना सिन्हा,फरोख कूपर,हणमंतराव गायकवाड,डॉ. रणजीत जगताप,डॉ. सुरेश भोसले या मान्यवरांना सदर पुरस्काराने सन्मानित केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!