पुण्यात भीषण पाणी टंचाई
शहरात रोज हजारो टँकरने पाणीपुरवठा
पुणे :
पुणे कधीकाळी ओळखलं जायचं ते मुबलक पाण्यासाठी. पण आता पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा अपुरा ठरू लागल्याने शहरातील मोठ्या लोकसंख्येला वर्षाचे बाराही महिने टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.उन्हाच्या झळा वाढू लागल्यानंतर तर पाण्याची टंचाई आणखी वाढत चालली आहे. सध्या पुण्यात दररोज हजारो टँकर्सच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. पुणे महापालिकाकडून दररोज साडे अकराशे टँकर्स वेगवगेळ्या भागात पुरवले जात असले तरी ते अपुरे ठरत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेहजारो खाजगी टँकर्स सोसायट्यांना पाणीपुरवठा करताना दिसत आहेत. पाण्याची ही गरज भागवण्यासाठी बोअरवेलच्या साहाय्याने जमिनीतून पाणी उपसून ते शेततळ्यात ओतलं जातं आहे आणि तिथून ते टँकर्समध्ये भरून शहराच्या विविध भागात पाठवलं जातं आहे.यातच आता निवडणुकींचे दिवस सुरु आहेत.नो वॉटर, नो वोट, अशा आशयाचे पोस्टर्स पुण्यातील विविध भागात लावण्यात आले आहेत. हे पोस्टर लावून पाण्यासाठी नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये महापालिकेचं पाणी येत नाही. त्यामुळे ज्या दिवसांपासून पुण्यातील नागरिकांनी घर घेतलं आहे. त्या दिवसापासून पुण्यातील अनेक नागरिकांनाच्या घरात महापालिकेचं पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना पहिल्या दिवसापासून पाणी विकत घ्यावं लागत आहे. याच कारणामुळे आम्ही फक्त टॅक्स भरतो पण महापालिकेचं पाणी येत नसल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखवली आहे.
पुण्यातील नागरिकांवर पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतण्याची वेळ आली आहे. त्यातच प्रत्येक सोसायटीला साधारण 4 ते साडे चार लाख लाख रुपयांचं पाणी विकत घ्यावं लागत आहे. रोज 20 टॅंकर पाणी विकत घ्यावं लागत आहे. महापालिकेने पाण्याचं कनेक्शन दिलं मात्र आतापर्यंत दोनवेळाच पाणी आलं आहे, असंही नागरिकांनी सांगितलं आहे
