एक दिवसीय समर कॅम्प उत्साहात


रयत सायन्स अँड ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे आयोजन

सातारा
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या रयत सायन्स आणि इंनोवेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे मुलांसाठी एक दिवसीय समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते
८० विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला हा समर कॅम्प उत्साहात पार पडला त्यासाठी सेंटरचे इन्चार्ज डायरेक्टर डॉक्टर सारंग भोला यांनी परिश्रम घेतले
पहिल्या सत्रामध्ये सायन्स सेंटरचे क्युरेटर सचिन सोनुले यांनी सहभागी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि नाविन्य याची माहिती देतानाच कागदापासून कलाकृती तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले कागदाच्या शीटपासून विविध प्रकारचे पक्षी कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना सचिन सोनुले यांनी दिले

Advertisement

 


दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःहून तयार केलेल्या कागदी कलाकृती सादर केल्या या सत्रामध्ये विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रमही झाला शेवटी डॉक्टर सारंग भोला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सचिन सोनुले यांनी आभार मानल्यानंतर समर कॅम्पची सांगता झाली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!