जरांगेंमुळे मविआसोबत बिनसलं
प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण
बीड
वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यामागचं खरं कारण प्रचारसभेदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
मनोज जरांगेंमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
येथील जाहीर सभेत बोलताना आंबेडकर यांनी घराणेशाही वरून भाजप आणि महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. बीडचे उमेदवार अशोक शिंदे यांच्या प्रचारार्थ आंबेजोगाई शहरात आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा का दिला नाही बाहेर का पडले याचं खरं कारण सांगितले आहे. मी जरांगे पाटलांना सोबत घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत जाऊ असा म्हटलं होतं. मात्र हे बोलताच मिठाचा खडा पडावा अगदी तशी अवस्था तिथे पाहायला मिळाली असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
मनोज जरांगे पाटील यांनी एकाला कुणालाच पाठिंबा दिला नाही. त्यांनी मराठा समाजाला सपोर्ट न करणाऱ्यांना पाडा अशी जाहीर भूमिका घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं. इतकंच नाही तर मुंबईपर्यंतही ते आले होते. मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या एका पक्षाला आपला पाठिंबा दर्शवला नाही. असं असतानाही महाविकास आघाडीला त्यांचं वावडं का अशीही कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
