साताऱ्यात गुरुवारी गाण्यांची सुरेल मैफिल
दीपलक्ष्मी पतसंस्था व संगीत प्रेमीतर्फे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व संगीतप्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ३० जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे गाण्याची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गजानन दीक्षित, मुकुंद फडके, डॉक्टर सारिका देशपांडे, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. या संगीत मैफिलीचे आयोजन संगीतप्रेमी ग्रुपचे संस्थापक प्रमोद, लोंढे राजेंद्र पाटील, विनय कुमार यांनी केले आहे. यावेळी गायक कलाकार रमीजा सय्यद, स्नेहल चिंचणे, सुजाता नावांधर, उज्वला कळंबेकर, सलामअली बागवान, प्रदीप पवार, चारुहास सप्रे, डॉक्टर बारटक्के, सलीम चाचा, शरीफ सलाती गाणी सादर करणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

