बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा


प्रसिद्ध माफीनाम्यावर समाधान व्यक्त
नवी दिल्ली
सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन यांना मोठा दिलासा दिला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी प्रसिद्ध केलेल्या माफीनाम्याच्या भाषेवर कोर्टाने समाधान व्यक्त केले आहे तसेच दोघांनाही पुढील सुनावणीला कोर्टात वैयक्तिक हजर राहण्यापासून देखील सूट दिली आहे.
पतंजली फसव्या जाहिरात प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीला बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन यांनी जाहिर केलेल्या माफीनाम्यावर कोर्ट पुढे काय आदेश देणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. आज या प्रकरणात सदर माफीनामा कोर्टाने मान्य केला आहे.
या आधी झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने म्हटलं होतं की, तुम्ही जेवढ्या आकाराच्या जाहिराती छापल्या होत्या तेवढ्याच आकाराचा माफीनामा छापला आहे का? तुम्ही छापलेल्या जाहिरातींच कटिंग कोर्टाला पाठवा, अशा सूचना न्यायमूर्ती हीमा कोहली यांनी दिल्या होत्या.तसेच बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना पुढील दोन दिवसांत ऑन रेकॉर्ड माफीनामा देण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. यामध्ये आमची चूक झाली असे लिहिण्याचे आदेश देखील कोर्टाकडून देण्यात आले होते. त्यावर बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना ऑन रेकॉर्ड माफीनामा सादर केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!