पतंजलीच्या १४ उत्पादनांवर बंदी


योगगुरू बाबा रामदेव यांना मोठा धक्का
डेहराडून
ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात योगगुरू रामदेव यांना उत्तराखंड सरकारने मोठा झटका दिला आहे. सोमवारी बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या १४ उत्पादनांचा उत्पादन परवाना उत्तराखंडच्या औषध नियामकाकडून तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
योगगुरू रामदेव यांना उत्तराखंड सरकारने मोठा झटका दिला आहे. राज्य नियामकाने रामदेव यांच्या १४ फार्मा कंपन्यांचे परवाने निलंबित केले असून या उत्पादनांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती वारंवार प्रसिद्ध केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. उत्तराखंडच्या ड्रग्ज रेग्युलेटरीने हा आदेश १५ एप्रिलला दिला होता पण अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
पतंजलीच्या ज्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे त्यामध्ये दिव्या फार्मसीचे दृष्टी आय ड्रॉप, स्वसारी गोल्ड, स्वसारी वटी, ब्रॉन्कॉम, स्वसारी प्रवाही, स्वसारी अवलेह, मुक्ता वती एक्स्ट्रा पॉवर, लिपिडॉम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत, ॲडव्हान्स, लिवोग्रिट आणि आयग्रिट गोल्ड यांचा सामावेश आहे. याशिवाय योगगुरु रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली यांच्या विरोधात ड्रग्ज आणि मॅजिक रेमेडीज कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

Advertisement

गेल्या महिन्यात रामदेव आणि त्यांची औषध कंपनी पतंजली आयुर्वेद यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते. आता या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात ३० एप्रिल रोजी सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालय आयएमएच्या २०२२ च्या याचिकेवर सुनावणी करत आहे, ज्यावर कोविडविरोधी लसीकरण मोहीम आणि औषधांच्या आधुनिक पद्धतींना बदनाम करण्यासाठी मोहीम चालवल्याचा आरोप आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!