तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
न्यूजमंडी/पॉझिटिव्ह
समाज सेवा करणे जेष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर
आरोग्यात सुधारणा होतेच , शिवाय सकारात्मकताही वाढते

वॉशिंग्टन
दीर्घकाळ नोकरी करून निवृत्त झाल्यावर वेळ कसा घालवायचा याबाबत ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच चिंता वाटत असते आता एका नवीन संशोधनाप्रमाणे निवृत्त जेष्ठ नागरिकांनी जर समाजसेवेमध्ये आणि स्वयंसेवेमध्ये काळ व्यक्तीत केला तर त्यांच्या आरोग्यातही सुधारणा होते आणि त्यांच्या आयुष्यात सकारत्मकताही निर्माण होते जागतिक स्तरावर काम करणाऱ्या अलझायमर असोसिएशनचे एक संमेलन नुकतेच एम्स्टरडॅम येथे पार पडले त्या संमेलनामध्ये सादर करण्यात आलेल्या एका संशोधन अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे समाजसेवा करणाऱ्या वृद्धांची स्मृती सुद्धा चांगली राहते आणि आगामी कालावधीमध्ये त्यांना विस्मरणासारखे आजार जडत नाहीत असे या अहवालात म्हटले आहे अल्झायमर असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया कॅरीलो यांनी दिलेला माहितीप्रमाणे समाजसेवेत गुंतलेल्या जेष्ठ नागरिकांचा आयुष्यावर योग्य फोकस होतो ते योग्य प्रकारे विचार करायला लागतात त्यांच्या मनात कोणतेही नकारात्मक विचार येत नाहीत अजूनही आपण उपयुक्त आहोत ही भावना त्यांच्या मनात सकारात्मकता निर्माण करते सर्वसाधारणपणे निवृत्तीनंतर जेष्ठ नागरिकांना डिप्रेशन निद्रानाश विस्मरणअसे अनेक विकार जडत असतात पण कोणत्या ना कोणत्या कारणाने एखाद्या सामाजिक संस्थेशी संबंध ठेवून ज्येष्ठ नागरिकांनी समाजसेवेमध्ये भाग घेतला तर ते या आजारापासून दूर राहू शकतात असेही या अहवालात म्हटले आहे अशा प्रकारची समाजसेवा करत असताना ज्येष्ठ नागरिक समाजात मिसळत असतात नवनवीन ओळखी निर्माण होत असतात त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या मनावर होतो आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा होते असेही या अहवालात म्हटले आहे
न्यूजमंडी/ज्ञानकोश

अविश्वास ठराव
2008 साली \संसदेत रंगलेलं नाट्य
2008 साली मनमोहन सिंग सरकारची अशीच एक परीक्षा झाली होती. पण त्याला अविश्वास ठराव म्हणण्यापेक्षा तो विश्वासदर्शक ठराव होता. भारत अमेरिका अणुकरारावरून डाव्या पक्षांनी मनमोहन सिंग सरकारला दिलेला 60 खासदारांचा पाठिंबा काढून घेतला.अशात आपल्याकडे हा अणुकरार पुढे न्यायला पुरेसा पाठिंबा आहे, हे दाखवायला UPA सरकारनेच हा ठराव सभागृहात मांडला. हा इतका दुर्मिळ योग होता की 2 दिवसांच्या चर्चेनंतर अखेर डाव्या पक्षांनी भाजपसोबत जाऊन सरकारविरोधात मतदान केलं, पण तरीही मनमोहन सिंग सरकार तरलं. 275 खासदारांनी सरकारवर विश्वास दाखवला तर 256 खासदारांनी नाही.यावेळी पहिल्यांदा लोकसभेत नोटांची बंडलं आणण्यात आली आणि यूपीए सरकारवर भाजपने खासदारांना विकत घेण्याचा आरोप केला होता

न्यूजमंडी/सुविचार
१. अनेकवेळा आलेले अपयश हे एका यशाने संपून जाते.
२. नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते.
३. मोठमोठ्या गोष्टी करणारे लोकं मोठे नसतात, तर छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात.

न्यूजमंडी/विनोद
टिकली
सासू: कित्ती वेळा सांगितलंय
बाहेर जातांना टिकली लावत जा
सूनबाई: अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत
सासू: अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने…!
भूक
भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना
पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी : हा आहे साहेब

न्यूजमंडी/खाद्ययात्रा
आप्पेपात्रातले कोफ्ते
साहित्य कोफ्त्यांसाठी :
किसलेले पनीर एक वाटी , साधारण पाऊण वाटी चितळे गुलाबजामचे कोरडे मिक्स, किसलेले गाजर अर्धी वाटी, दोन बटाटे उकडून किसून, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, पाच काजू- अर्धबोबडे ,चिमूटभर वेलची पूड, अर्धा चमचा साखर , मीठ, चमचाभर तिखट, चमचाभर गरम मसाला , दोन चिमूट कसूरी मेथी. परतण्यासाठी तेल. पत्ताकोबी घरात असूनही लक्षात आले नाही घालायचे.
साहित्य करीसाठी:
दोन कांदे, चार टोमॅटो, प्रत्येकी एकएक चमचा आलेलसूण पेस्ट, चमचाभर तिखट,१- २ चमचे गरम मसाला / शाही पनीर मसाला,चिमूटभर वेलची पूड, अर्धा चमचा साखर, मीठ, चिमूटभर हळद, दोन तमालपत्रं, अर्धा कप दूध ,अर्धा कप हाफ अँड हाफ. जी अर्धी मलाई असते, त्यातल्या त्यात कमी स्निग्धांश असलेली मलई असते.
कृती:
कोफ्त्यांसाठी वर दिलेले सगळे घटक एका मोठ्या बोलमधे गोळा करा. हलक्या हाताने मिसळून व मळून गोळे करून घ्या. ‘हलक्या हाताने’ लक्षात ठेवा कारण हे बेसनाचे लाडू नव्हेत. दाबून मळलेले कोफ्ते गच्च होतात व पोटांत (त्यांच्या) कच्चे रहातात. शिवाय आपण तळून न घेता परतून घेणार आहोत, म्हणून वरून किंचित चपटेही चालतील. हे चेंडू किंवा तबकड्या आप्पेपात्रात व्यवस्थित परतून घ्या. दोनतीन थेंब तेल घालून प्रत्येक बाजू परतायला मध्यम आचेवर तापलेल्या आप्पेपात्रात तीन मिनिटे तरी लागतील. .
दोन कांदे , आले लसून पेस्ट एकत्र करून थोड्या तेलावर+थोड्या लोण्यावर दोन तमालपत्रं घालून परतली, क्रिमी दिसायला लागल्यावर दोन टमाट्यांची पेस्ट त्यावर घातली . दोन उकळ्या येऊ दिल्या.परतून झाल्यावर त्यात कोरडे मसाले , साखर , वेलची पूड वगैरे घालून अजून दहा मिनिटे उकळले, मलई व दूध थोडे उकळून कसूरी मेथी घातली.अगदी खायच्या पाच मिनिटे आधी आफ्ते यांत सोडले. घटकाभर मंद आचेवर राहू दिले .कोफ्ते मऊच हवे असतील तर अजून शिजवून घ्या.
