साहित्य संमेलन बोधचिन्हाचे बुधवारी अनावरण
प्रख्यात हास्यचित्रकार शि द फडणीस यांच्या हस्ते अनावरण
सातारा
सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी होणार आहे हा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता पुणे येथील माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये होणार आहे ज्येष्ठ हास्यचित्रकार शि द फडणीस यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नामदार शिवेंद्रसहराजे भोसले, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन यांनी केले आहे

