पाकिस्तानी तरुणीला भारतीय हृदय


चेन्नईत्या भारतीयाने एका पाकिस्तानी तरुणीला त्याचे हृदय दिले. शब्दशः दिले. येथील एमजीएम हेल्थकेअरमध्ये झालेल्या या हृदय प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कराची येथील आयेशा रशीद या युवतीला जीवनदान मिळाले असून तिच्या शरीरात भारतीय हृदयाची धडधड सुरू झाली आहे.
आयेशाच्या हृदयाच्या झडपांमध्ये छिद्र असल्यामुळे तिच्यासाठी हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय होता. या शस्त्रक्रियेचा 35 लाखांपेक्षा जास्त खर्चभार रुग्णालय आणि चेन्नईस्थित ऐश्वर्याम ट्रस्टने उचलला होता. दिल्लीतील एका 69 वर्षीय ब्रेन डेड रुग्णाकडून तिला हृदय मिळाले नव्हे, नवसंजीवनीच मिळाली आहे. आयेशा आता मायदेशी रवाना होणार आहे. मात्र मी नक्की परत येईल, असा कृतज्ञ भाव तिने आणि तिची आई सनोबर यांनी परतताना व्यक्त केला होता. पाकिस्तानातील डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगितल्यामुळे त्या निराश झाल्या होत्या.भविष्यात फॅशन डिझायनर होण्याची आकांक्षा असलेल्या आयशा रशीदने कृतज्ञता व्यक्त करताना भारत सरकार आणि तिच्या डॉक्टरांचे आभार मानले आणि भविष्यात भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली. चेन्नईमध्ये हृदय प्रत्यारोपण झालेल्या रुग्ण आयशा रशीदने सांगितले की, हृदय प्रत्यारोपण करता आल्याने मला खूप आनंद झाला आहे. मी भारत सरकारचे आभार मानते. मी एक दिवस नक्कीच भारतात परत येईन. उपचारासाठी मी डॉक्टरांचेही आभार मानते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!