पंजाबचा विक्रमी विजय


२६२ धावांचे उद्दिष्ट्य गाठून कोलकातावर विजय
मुंबई
आयपीएल 2024 चा 42 वा सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने फलंदाजी करून पंजाबला विजयासाठी 262 धावांचं आव्हान दिले होते.पंजाब किंग्सने विजयाचे आव्हान पूर्ण करून 8 विकेट्सने विजय मिळवला. यासह पंजाबने आयपीएलमधेच नाही तर टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर चेस केला.
कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली तर केकेआरला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले. यावेळी केकेआरच्या टीमकडून सुनील नरेन 32 बॉलमध्ये 71 आणि फिलिप सॉल्टने 37 बॉलमध्ये 75 धावांची खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने 39, रसेलने 24, श्रेयस अय्यरने 28 धावा केल्या.
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांना केकेआरच्या 6 विकेट्स घेण्यात यश आले. पंजाबकडून अर्शदीप सिंहने सर्वाधीक 2 तर सॅम करन, हर्षल पटेल आणि राहुल चहरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. केकेआरने 20 ओव्हरमध्ये फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावून 261 धावा केल्या आणि पंजाबला विजयासाठी 262 धावांचं आव्हान दिले आहे.

Advertisement

पंजाब किंग्सकडून विजयाचे आव्हान पूर्ण करताना जॉनी बेअरस्टोने शतक ठोकून 48 बॉलमध्ये 108 धावांची कामगिरी केली. तर शशांक सिंहने 28 बॉलमध्ये 68 धावा केल्या. पंजाब किंग्सकडून सलामीवीर फलंदाज प्रभसिमरन सिंहने 54 तर ने 26 धावा केल्या. केकेआरची टीम पंजाबच्या केवळ 2 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरली. यात सुनील नरेनने एक विकेट घेतली तर प्रभसिमरन सिंहला रनआउट करण्यात त्यांना यश आले होते. पंजाब किंग्सने 8 विकेट्स राखून 262 धावांचा स्कोअर चेस केला.पंजाब किंग्स ही आयपीएलच नव्हे तर टी 20 क्रिकेटच्या इतिहासात एवढा मोठा रनचेस करणारी पहिली टीम ठरली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!