कोणीतरी आहे तेथे


एलियनच्या अस्तित्वाबाबतचा सर्वात मोठा पुरावा संशोधकांच्या हाती
वॉशिंग्टन
पृथ्वीबाहेर इतर ग्रहावर एलियनचा शोध घेतला जात आहे. एलियनच्या अस्तित्वाबाबतचा आजपर्यंतचा सर्वात मोठा पुरावा संशोधकांच्या हाती लागला आहे. पृथ्वी सारखा दिसणारा पण पृथ्वीपेक्षा 9 पट मोठा असलेल्या K2-18B या एक्सोप्लॅनेटवर जीवसृष्टी असल्याचा दावा केला जात आहे.
या अनुषगांने या संशोधक संशोधन करत आहेत. संशोधकांच्या एलियन मोहिमेत मोठे यश आले आहे. लवकरच एलियनशी संपर्क साधता येणार आहे.
नासाच्या वेब टेलिस्कोपने K2-18B हा एक्सोप्लॅनेट शोधला आहे. एक्सोप्लॅनेट K2-18B सध्याच्या पृथ्वीपेक्षा 8.6 पट मोठा आहे. यापूर्वीच्या संशोधनात K2-18B या एक्सोप्लॅनेटच्या वातावरणात मिथेन वायू आणि कार्बन डायऑक्साईडशी संबंधित रेणूही सापडले होते. या ग्रहावर मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असल्याने याला हायसेन प्लॅनेट असेही म्हंटले जाते.K2-18B हा एक्सोप्लॅनेट पृथ्वीपासून 120 प्रकाशवर्षे दूर आहे. K2-18B या एक्सोप्लॅनेटचा आकार जवळजवळ पृथ्वी आणि नेपच्यूनच्या आकाराएवढा आहे. हा ग्रह सौरमालेतील इतर ग्रहांपेक्षा वेगळा आहे.
संशोधनदरम्यान K2-18B या एक्सोप्लॅनेटवर विशिष्ट प्रकारचे वायू सापडले आहेत. डायमिथाइल सल्फाइड वायू असे याचे नाव आहे. हे वायू सागरी जीव तसेच विशिष्ट प्राण्यांच्या अस्तित्वामुळे निर्माण होतात. नविन संशोधनात K2-18B या एक्सोप्लॅनेटवर डायमिथाइल सल्फाइड वायूचे अस्तित्व दिसून आले आहे.
या पूर्वीच्या संशोधनात खगोलशास्त्रज्ञांना या ग्रहावर मिथेन, अमोनियासह इतर वायू आणि रसायने सापडली आहेत, परंतु ही रसायने तुलनेने कमी प्रमाणात आहेत. परंतु हे वायू जैविक प्रक्रियेच्या कार्यात कितपत उपयुक्त ठरतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, येथे मोठ्या प्रमाणात हायड्रोजन आहे. या ग्रहावर पाण्याचे महासागर आहेत. यामुळे येथे जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर अधिक संशोधन सुरु आहे. या ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वासा असल्यास येथे मानवी वस्ती विकसीत करता येवू शकते. या ग्रहावर पाणी असल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे या ग्रहावर सृष्टी असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. सूर्यमालेच्या बाहेरचा ग्रह आहे. या ग्रहावर पृथ्वीएवढंच तापमान असल्यामुळे हे सजीवसृष्टीला पोषक असल्याची माहिती अवकाश विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या फ्रान्समधल्या संस्थेनं म्हटलंय. सूर्यमालेच्या पलिकडल्या ग्रहावर पाणी आढळल्याची ही पहिलीच घटना आहे. पृथ्वीसारखाच केटू-18 बीवर खडकाळ भाग आढळल्याचंही फ्रान्सच्या अवकाश शास्त्रज्ञांचं म्हणण आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!