माफीनामा ठळक छापलात का?


रामदेवबाबांना सुप्रीम कोर्टाचा सवाल

नवी दिल्ली
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींशी संबंधित प्रकरणात योग गुरू रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बालकृष्ण यांनी मंगळवारी (23 एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की, त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये माफीनामा छापला आहे.मात्र, वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेले माफीनामे त्यांच्या जाहिरातीइतकेच ठसठशीत होते का असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने या दोघांनाही केला.

Advertisement

रामदेव आणि बालकृष्ण यांना आज (23 एप्रिल) सर्वोच्च न्यायालयासमोर हजर व्हायचं होतं.मागील सुनावणीदरम्यान रामदेव आणि बालकृष्ण या दोघांनीही सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली होती आणि सार्वजनिकरित्या माफीनामा छापण्याचाही प्रस्ताव दिला होता.जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस एहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठासमोर पतंजलि आयुर्वेद, त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आचार्य बालकृष्ण आणि सह-संस्थापक रामदेव यांच्या विरोधात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी सुनावणी सुरू आहे.रामदेव आणि बालकृष्ण यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी सांगितलं की, सोमवारी (22 एप्रिल) 67 वर्तमानपत्रांत माफीनामा छापला आहे.तेव्हा न्यायालयाने अशी विचारणा केली या प्रकरणाची पुढची सुनावणी 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!