जगासमोर नवं संकट


कोरोना व्हायरसनंतर आता चीनच्या कीटकाचा कहर

बीजिंग :
चीनमधून जगभर भरलेल्या कोरोना व्हायरसने चांगलंच थैमान घातलं होतं. आता या व्हायरनंतर चीनमधील एका कीटकाने कहर केला आहे. हा कीटक अनेक देशांमध्ये पोहोचला आहे.तो इतका धोकादायक आहे की संपूर्ण जगासाठी संकट बनू शकतो.लाँग हॉर्न बीटल नावाचा कीटक चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. लांब शिंग असलेला हा कीटक, ज्याला काही लोक लेडीबग या नावानंही ओळखतात.

Advertisement

हा किडा 1924 मध्ये पहिल्यांदा युरोपमध्ये सापडला हा किडा चीन, तैवान आणि कोरियन द्वीपकल्पात आढळतो. एकदा कुठे हा कीटक आला की त्याला तिथून काढणं अवघडच नाही तर अशक्यही असतं. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड आणि भारतातील अनेक राज्यांसाठी हे आव्हान आहे.हे इतकं धोकादायक आहेत की ते कोणत्याही झाडात घुसले तरी काही दिवसात ते पूर्णपणे नष्ट करते. झाडांमध्ये गोल छिद्र करून त्यात अंडी घालतो, तिथून ते पसरतात. छिद्रामुळे झाडाला पोषक तत्वं मिळत नाहीत आणि एक दिवस ते सुकते. हा संसर्ग शेवटी झाडांना मारतो. केवळ झाडं कापूनच याचा सामना केला जाऊ शकतो. यामुळे जगभरात अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होत आहे.
जर्मनीतील हॅम्बर्ग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते, जर तो तुमच्या घरात घुसले तर ते सर्व काही खाऊन टाकतो. तुमचा सोफा, जेवणाचं टेबल आणि खुर्च्या. म्हणूनच त्यांना घरांमध्ये उपद्रव निर्माण करणारे कीटकदेखील मानले जातात. अलीकडेच स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी प्रचंड विध्वंस केला आहे. त्यामुळे जंगलाचा मोठा भाग कापावा लागला. कारण लेडीबगपासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संक्रमित झाडं नष्ट करणं. अनेक देशांमध्ये यामुळे बांबू उद्योगाचंही मोठं नुकसान झालं आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!