दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर


मलेशियातील दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू

Advertisement

कुआलालूंपूर
मलेशियामध्ये नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची एका सरावादरम्यान आकाशातच टक्कर झाल्याने मोठा अपघात घडला आहे. हे हेलिकॉप्टर्स रॉयल मलेशियन नौदलाच्या दीक्षांत कार्यक्रमाआधी हे हेलिकॉप्टर्स सराव करत होते. तेव्हा अचानक हा प्रकार घडला.”दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये किमान 10 क्रू मेंबर्स होते. त्या सगळ्यांचा आकाशातच दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. “दोन्ही हेलिकॉप्टर्समधील सर्वांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे पार्थिव लष्करी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे,” असं रॉयल मलेशियन नौदलाने म्हटलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी सरकारने एका समितीची स्थापना केली आहे, असं नौदलाकडून सांगण्यात आले आहे.
स्थानिक मीडियामध्ये दिसलेल्या फुटेजनुसार, स्टेडियममध्ये उतरण्याआधीच हे दोन हेलिकॉप्टर एकमेकांना धडकले. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी (23 एप्रिल) 9.30 वाजता ही घटना घडली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!