यशवंतराव चव्हाणांना भारतरत्नसाठी प्रयत्न करणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात प्रमुख मागणी
मुंबई :
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा जाहीर केला.या जाहीरनाम्यात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरनामा जाहीर केला. यावेळी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नेतेही उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या विचारावर आम्ही हा जाहीरनामा तयार केला आहे. दिलिप वळसे पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगला जाहीरनामा तयार केला त्याबद्दल त्याचे आभार. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, यशवंतराव चंव्हांनांना भारतरत्व द्यावे यासाठी प्रयत्न करणार आहे.
विरोधकांच्या इंडिया आघाडीवर निशाणा साधताना अजित पवार यांनी म्हटलं की, विरोधी बाकावर असे कोणीच नाही की जो नरेंद्र मोदीसमोर उभा राहू शकेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे आणि त्यासाठी आम्ही पक्ष म्हणून काम करू अशी भूमिका घेण्यात आली आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाम पाठिंबा राहील याची आम्ही हमी देत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. तसंच पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर प्रधानमंत्री शेत-शिवार-पाणंद रस्ता या नव्या योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही भूमिका बजावेल.
सबका साथ सबका विकास या मोहिमेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा व सहभाग आहे. यात ८० कोटी नागरिकांना मोफत रेशन वाटप, पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहणा. जनधन योजनेंतर्गत ५० कोटी जनता लाभार्थी. ४ कोटी नागरिकांना पक्की घरे. २५ कोटी नागरिकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणले. ४६ कोटी हून अधिक लोकांना २७ लाख कोटींपेक्षा जास्त मुद्रा योजनेचा लाभ. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा. फेरीवाल्यांसाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत ६३ लाखापेक्षा जास्त फेरीवाल्यांना कर्जपुरवठा. पंतप्रधान सूर्यघर योजनेतून मोफत वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार.
जातनिहाय जनगणना व्हावी हा मुद्दा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्यावर हा विषय चर्चिला गेला होता. जातनिहाय जनगणना व्हावी असे अनेक पक्षांनी मत मांडले होते. आता सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाकडून ही मागणी केली गेली असून थेट जाहीरनाम्यात ह्या मुद्यावर भर दिला आहे.
