गुरुवारी राजकपूर-नर्गिस हिटस स्पेशल गाण्यांचा कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था आणि हार्मनी ग्रुपतर्फे आयोजन
सातारा.
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व हार्मनी ग्रुप यांच्यातर्फे गुरुवारी दिनांक ०३ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे ‘ राजकपूर- नर्गिस हिट्स ‘ हा गाण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.या कार्यक्रमाची संकल्पना मुकुंद फडके यांची असून दिग्दर्शन शिरीष चिटणीस यांचे आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शाम बडवे, मुकुंद फडके, शिरीष चिटणीस,रविंद्र शिवदे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी राजकपूर नर्गिस यांच्या चित्रपटातील अनेक मेलोडीयस गाण्यांचे सादरीकरण गायक कलाकार रवींद्र खांडेकर, नितीन मूळे, संगीता हेंद्रे करणार आहेत.
कार्यक्रमाचे निवेदन संगीता हेंद्रे करणार असून ध्वनी व्यवस्था रवींद्र खांडेकर पाहणार आहेत.सर्वांनी या गाण्यांच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरीष चिटणीस, रवींद्र खांडेकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे

